जिल्ह्यात आजपर्यंत ९१ हजार ८४७ रुग्ण कोरोनामुक्त; २ हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९१ हजार ८४७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २  हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १३२, चांदवड ३७, सिन्नर ३७६, दिंडोरी ७७, निफाड  १४८, देवळा १५, नांदगांव ७२, येवला १८, त्र्यंबकेश्वर ४१, सुरगाणा ०५, पेठ ०४, कळवण १२,  बागलाण ५९, इगतपुरी २८, मालेगांव ग्रामीण ५४ असे एकूण १ हजार ७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६५०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२० तर जिल्ह्याबाहेरील १६ असे एकूण २ हजार ८६४  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९६  हजार ४३०  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.८४,  टक्के, नाशिक शहरात ९६.०३ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.१३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ६२९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८८१ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७०  व जिल्हा बाहेरील ३९ अशा एकूण १ हजार ७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. १३ नोव्हेंबर सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790