NC

जिल्ह्यात आजपर्यंत ९१ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त; २ हजार ८११ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९१ हजार ७४३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २  हजार ८११ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ७१५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १२४, चांदवड ३७, सिन्नर ३६९, दिंडोरी ७३, निफाड  १२९, देवळा १२, नांदगांव ६८, येवला २८, त्र्यंबकेश्वर ४१, सुरगाणा ०३, पेठ ०३, कळवण १०,  बागलाण ५८, इगतपुरी २४, मालेगांव ग्रामीण ५१ असे एकूण १ हजार ३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६४९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११७  तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण २ हजार ८११  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९६  हजार २६९  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.०१,  टक्के, नाशिक शहरात ९६.०३ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.१९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.७८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.३० इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ६२७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ८७९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७०  व जिल्हा बाहेरील ३९ अशा एकूण १ हजार ७१५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. १२ नोव्हेंबर सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790