नाशिकमध्ये १३ ऑगस्ट पर्यंत मध्यम पाऊस, ४.२ मिमी. तूट भरुन निघण्याची चिन्हे

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात बुधवारपासून (दि.७) १३ ऑगस्टपर्यंत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत मध्यम, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत जोरदार, मुंबईसह कोकणात अतिजोरदार तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

नाशिकमध्ये ६ ऑगस्टपर्यंत सरासरी ५३५ मिलिमीटर पाऊस पडतो. तो यावेळी ५३०.८ मिलिमीटर झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात मध्यम पाऊस असल्याने ही तूट भरुन निघण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

महिनाखेरीस ला- निना प्रभावाचा हा होणार परिणाम:
ऑगस्ट अखेरीस ला निनामुळे पावसावर परिणाम होईल. अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पावसाची स्थिती पूर्वीसारखी तर विदर्भात सरासरी पावसाची ओढ राहील. घाटमाथ्यावरच अधिक पावसाची शक्यता आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर टिकून राहील. पुणे, सातारा, कोल्हापूरमधील धरण क्षेत्रात पावसाच्या जोरामुळे पुन्हा पुराचा धोका आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील तापमानीय स्थिती पावसास अटकाव करणारी जरी नसली तरी ती पावसासाठी पूरकही जाणवत नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790