नाशिक, दि. 20 मे, 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबले असले तरी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तलय नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 नुसार 16 मे 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 3 जून 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत नो ड्रोन प्लाय झोन आदेश जारी केला आहे.
या आदेशान्वये महत्वाचे धार्मिक स्थळ, गर्दीचे रेल्वे स्थानके, शॉपिंग मॉलस्, औद्योगिक क्षेत्र या सर्व ठिकाणी ड्रोन, रिमो नियंत्रित मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटरर्स, हँग ग्लायडर्स, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवाई क्रियाकलपांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 223 व इतर लागू कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.