नाशिक: दुर्दैवी घटना; शेत तळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक (दीपक श्रीवास्तव): निफाड येथील  प्रेम गोपाळ ढेपले (15) आणि  त्याचा लहान भाऊ प्रतिक गोपाळ ढेपले (13) या दोघांचा घराजवळील शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू  ओढवला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले (रा.) निफाड यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती.

मात्र अर्धा  तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी  त्यांना शोधण्या करता गेली. जवळपास शोध घेतला असता जवळच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले.

मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. शेततळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांचा जीव वाचवण्याची संधी मिळू शकली नाही.

प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळत उतरला असावा मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू  ओढवला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790