नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 29 मार्च रोजी आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि युवाशक्ती फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता सौभाग्य लॉन्स, पपया नर्सरी शेजारी, त्र्यंबकरोड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या/ नियोक्ते उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.

हे ही वाचा:  Traffic Alert: नाशिक शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात उद्या (दि. ३० मार्च) महत्वाचे बदल !

भरती इच्छुक नियोक्त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या ऑप्शन वर क्लिक करुन, पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व 29 मार्च 2025 रोजी रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती तडवी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790