🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: दिव्यांगांनी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोदंणी करावी

नाशिक। दि. १३ फेब्रुवारी २०२६: जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत 5 टक्के सेस निधी योजनेतून 18 ते 45 वर्षे वयोगटातील व किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र इच्छुकांनी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळासवरील स्वावलंबी नाशिक टॅबवर https://forms.gle/R6f639GNy3bhEaW46 या दुव्यावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, नाशिक संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर सलग ४१ तास खुले; तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजन करण्याचे नियेाजन आहे. जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी गुगल फॉर्मवर आपली अचूक माहिती भरून नोदंणी करावयाची आहे. आतापर्यंत एकूण 137 दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाली आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक, त्र्यंबकरोड, ए बी बी सर्कल जवळ नाशिक येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, नाशिक श्री शिंदे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790