🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

नाशिक, दि. १२ जुलै, २०२५: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि आयमा रिक्रेएशन सेंटर अंबड एमआडीसी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 16 जुलै 2025 रोजी पी-21 आईमा रिक्रेएशन सेंटर अंबड, एमआयडीसी, नाशिक ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

या रोजगार मेळाव्यात 11 पेक्षा अधिक नामांकित कंपन्या व नियोक्ते एकूण 415 रिक्त पदांसाठी नियोजित ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ईमेलवर किंवा 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच शासकीय रोजगार मेळाव्यात नियोक्ता व उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सेवा निशुल्क आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790