नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी व विणकरांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळावा यासाठी मुंबई विभागात विभागीय हातमाग कापड स्पर्धांचे आयोजन 19 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई कार्यालय येथे केले आहे. हातमाग विणकरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त वस्त्रोद्योग मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धेत प्रथम बक्षीस रूपये 25 हजार, द्वितीय बक्षीस रूपये 20 हजार व तृतीय बक्षिस रूपये 15 हजार असे बक्षिसाचे स्वरूप आहे. विणकरांनी या स्पर्धेसाठी हातमाग कापडाचे नमुने कार्यालय सकाळी 10 ते 11 या वेळेत दाखल करावेत. या नमुन्यावर विणकारांनी त्यांचे नाव, पत्ता, वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार, डिझाईन, रंग व कापडाची विशेषत: असे विवरण नमूद करावे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विणकारांनी किमान 1 नग व 2 मीटर कापड स्पर्धेसाठी आणावे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग मुंबई, भोरूका चॅरिटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, 5 वा मजा, 128- ब, पुना स्ट्रीट, मशीद (पूर्व) मुंबई 400009 यावर अथवा rddtextiles3mumbai@rediffmail.com या इमेल वर किंवा 022-23700611 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
![]()


