नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील नागरिक व अभ्यागत दररोज जिल्हाधिकारी नाशिक यांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. पंरतु काहीवेळा प्रशासकीय कामकाज व दौरे यामुळे जिल्हाधिकारी भेटू शकत नाही.
त्या अनुषंगाने सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत अभ्यागत व नागरिक हे जिल्हाधिकारी नाशिक यांना भेटू शकणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


