नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 8 ऑक्टोबर रोजी आयोजन

नाशिक। दि. २ ऑक्टोबर २०२५: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक कार्यालयाच्या वतीने बुधवार 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड, नाशिक येथे उमेदवारांसाठी जागेवर निवडीची संधी मोहीम 5, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

⚡ हे ही वाचा:  लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम… जाणून घ्या सविस्तर

सदर मेळाव्यात स्पार्क एचआर सोल्युशन, नाशिक, मारूती सेल्स प्रा.लि., ए.व्ही.एस ॲक्नॉलॉजी या नामांकित कंपन्या व नियोक्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. या मेळाव्यात 76 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

⚡ हे ही वाचा:  महावितरणमधील ग्राहकसेवेच्या कार्यालयांच्या पुनर्रचनेला आजपासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ !

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ईमेलवर किंवा 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच शासकीय रोजगार मेळाव्यात नियोक्ता व उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सेवा निशुल्क आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790