नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तासिका तत्वावर तज्ज्ञ प्राध्यापक पदभरती

नाशिक। दि. १ जानेवारी २०२६: केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत होणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2026 च्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे तज्ज्ञ प्राध्यापकांची रूपये 300 प्रति तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात पद भरती करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

पात्र तज्ज्ञ प्राध्यापकांनी संपूर्ण कादपत्रांसह 9 जानेवारी 2026 रोजी मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल शंकर सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

तज्ज्ञ प्राध्यापक हे संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित पदवीधर/ पदव्युत्तर असावेत. कमीत कमी दोन वर्ष स्पर्धा परीक्षेबाबत अध्यपनाचा अनुभव असणे गरजेचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सीडीएस-66 कोर्ससाठी 19 जानेवारी ते 3 एप्रिल 2026 आणि सीडीएस -67 कोर्ससाठी 15 जून ते 28 ऑगस्ट 2026 असा आहे. अध्यपनासाठी इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान-I ( सामान्यज्ञान, भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण), सामान्य विज्ञान-II ( अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) असे विषय आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा भ्रमणध्वनी 9156073306 तसेच दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 यावर संपर्क साधावा, असेही श्री. सोनवणे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790