नाशिक। दि. २८ नोव्हेंबर २०२५: जिल्ह्यातील नगरपंचायत/नगरपरिषद/नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपुरी, ओझर, पिंपळगाव बसवंत, त्र्यंबक या ११ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ही सुट्टी संबंधित नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लागू राहील.
मतदानासाठी दिलेली सुट्टी ही वरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या- त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद नगरपरिषद, नगरंपचायत, नगरपालिका क्षेत्रातील केंद्र सरकारची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका यांना ही सुट्टी लागू राहील असेही आदेशात नमूद केले आहेत.
![]()
