नाशिक। दि. २५ नोव्हेंबर २०२५: संविधान दिनानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित अर्जांच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आले. अशी माहिती जिल्हा जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या मोहिमेत समितीकडील ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहेत व ज्या अर्जदारांनी त्रुटीची पूर्तता केलेली नाही तसेच ज्या अर्जदारांना समितीकडून ईमेलवर सीसीव्हिआयएस-ll प्रणालीवर त्रुटी कळविण्यात आल्या आहेत परंतु त्रुटींची पूर्तता केलेली नाही, अशा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित मागासवर्गीय अर्जदारांच्या त्रुटींची पूर्तता 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत समितीच्या कार्यालयात अर्जादारांच्या समक्ष करण्यात येणार आहे.
कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये व त्रयस्थ व्यक्तीच्या अमिषास बळी पडू नये असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आल्याचे समितीचे संशोधन अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.
![]()
