नाशिक: शेतमालाची आधारभूत दरानुसार होणार खरेदी; शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत नोदणीची संधी

नाशिक। दि. २४ नोव्हेंबर २०२५: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई कार्यालयामार्फत हंगाम 2025-2026 साठी राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड मार्फत मका, बाजरी, रागी, ज्वारी संकरीत व ज्वारी मालदांडी खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करुन आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

केंद्र शासनाकडून मका पिकासाठी रूपये 2 हजार 400 प्रति क्विंटल, बाजरी रूपये 2 हजार 775 प्रति क्विंटल, रागी रूपये 4886 प्रति क्विंटल, ज्वारी संकरीत रूपये 3 हजार 699 प्रति क्विंटल आणि ज्वारी मालदांडी रूपये 3 हजार 749 प्रति क्विंटल असे आधारभूत दर निश्चित केले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

शेतकऱ्यांना भरडधान्य विक्रीसाठी गावातील नजिकच्या खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीकपेरा इत्यादी आवश्यक आहेत. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित रहाणे अनिवार्य असून आधार प्रमाणीकण व लाइव्ह फोटो घेणे आवश्यक आहे. तसेच खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एस.एम.एस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रसाठी केंद्रावर आणवा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आहे.

असे आहेत तालुकानिहाय मंजूर खरेदी केंद्र, संपर्क अधिकारी व संपर्क क्रमांक:

  1. येवला- येवला तालुका सह. खरेदी विक्री संघ, बाबासाहेब जाधव- 9423176349
  2. मालेगाव- शेतकरी सह. संघ,लि.मालेगाव, पांडूरंग बच्छाव- 8999469990
  3. देवळा- देवळा ता.सह.ख.वि.संघ लि. देवळा, गौरव आहेर- 9767579614
  4. निफाड- लासलगाव विभाग सह खरेदी विक्री संघ, लासलगाव, प्रभाकर बोराळे- 9763421257
  5. निफाड- कृषीसाधना म.फळे व भाजी. सह. संस्था लि. विंचूर, गौरव जाधव- 7038505386
  6. सिन्नर- सिन्नर तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. सिन्नर, दत्तात्रय राजभोसले- 9767602852
  7. चांदवड- चांदवड ता.सह खरेदी विक्री संघ, चांदवड, लक्ष्मण सोनवणे- 9011204130
  8. सटाणा- सटाणा (द) भाग वि.का.सह.सोसा.मर्या.सटाणा, पंकज सोनवणे- 9420367075
  9. सटाणा- नामपूर बृ.विविध कार्यकारी सोसा.मर्या.सटाणा, राजेंद्र धुसाणे- 9421501836
  10. नांदगाव- शनैश्वर नांदगाव ता.सह. खरेदी विक्री संघ लि. नांदगा, कचरदास गांधी- 9420230777
  11. चांदवड- चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था लि., अजय क्षीरसागर- 9823519411
  12. निफाड- आश्रय मार्केटिंग ॲण्ड प्रोससिंग को-ऑप सोसा.लि. खडकमाळेगाव, संपतराव शिंदे- 9423094826
  13. येवला- सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे वि.कार्य सेवा, योगेश एंडाईत- 9423220939
  14. मालेगाव- अंजनी मेंढपाळ सहकारी संस्था मर्या, साकुरीझाप, ता.मालेगाव, सुरेश निकम- 8275583591
  15. बागलाण- आलियाबाद आदिवासी विविध कार्य सह.संस्था मर्या.अलियाबाद, ता. बागलाण- अजय देवरे- 9356101676
  16. बागलाण- वीरगाव विविध कार्य. सह. (विकास) सेवा संस्था मर्या, वीरगाव, ता.बागलाण, पंकज बोरसे- 9130309755
  17. बागलाण- खामलोण विविध कार्य. सह. संस्था. खामलोण, ता.बागलाण, विशाल धोंडगे- 980936333

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790