नाशिक। दि. २३ जानेवारी २०२६: चांदवड तालुक्यातील मालसाने येथे 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या णमोकार तीर्थ महोत्सवाची प्रस्तावित कामांना गती देवून 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री बिऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, निवासी वैद्यकीय अधिकारी बाळू पाटील, चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,पाणीपुरवठा विभागाच्या श्रीमती वाडिले. सुमेर काला व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, 6 ते 25 फेब्रुवारीपर्यत होणाऱ्या णमोकार तीर्थ महोत्सवासाठी अति महत्वाच्या व्यक्तींसह पर्यटक भेट देणार आहे. यादृष्टने सर्व विभागांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडावी. पाणीपुरवठा विभागाने महोत्सव काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे. पार्किंग व्यव्यस्था, अंतर्गत रस्ते याबाबतची कामांना गती द्यावी.
महोत्सवाच्या ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना 24 जानेवारीपर्यंत कार्यालयीन आदेश निर्गमित करावेत. प्रस्तावित कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव 24 जानेवारी पर्यंत तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.
![]()


