नाशिक। दि. २१ ऑक्टोबर २०२५: दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सप्तशृंगी देवीचे मंदिर २२ ऑक्टोबरपासून रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भाविकांसाठी सोयीचा ठरणार आहे.
दिवाळी उत्सवानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. दरम्यान दिवाळीनिमित्ताने असलेल्या सुट्यांमध्ये फिरायला जात साडेतीन शक्तिपीठांतील आद्यपीठ असलेल्या वणीच्या गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. यामुळे या गर्दीत सर्व भाविकांना दर्शन घेणे शक्य होत नाही. यामुळे मंदिर संस्थानने मंदिर रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंधरा दिवस रात्रीपर्यंत मंदिर राहणार खुले:
दिवाळीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आलेल्या प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता यावं यासाठी निर्णय घेण्यात आला असून २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री १२ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. मंदिर पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रोप वे ट्रॉलीची सुविधा देखील पहाटे ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
![]()

