नाशिक। दि. २० जानेवारी २०२६: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 परीक्षेचे आयेाजन 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेसाठी पेपर 1 व 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार/ परीक्षार्थींचा अंतरिम निकाल 16 जानेवारी 2026 रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
परीक्षार्थींना हा निकाल त्यांच्या लॉगइन द्वारे ऑनलाईन पाहता येईल.अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी अथवा त्रुटी/ आक्षेप असल्या स उमेदवारांनी लॉगइनद्वारे 21 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


