news

नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 21 जानेवारीला आयोजन

नाशिक। दि. १७ जानेवारी २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक कार्यालयाच्या वतीने 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ४० किलो गांजाप्रकरणी दोघांना १० वर्षांची सक्तमजुरी

जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या मेळाव्यात एकूण 110 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात इयत्ता 8 वी, 10 वी, 12 वी, आयटीआय, डिल्पोमा, बीएससी, बीई, डिप्लोमा सर्व ट्रेड, पदवीधर यांना सहभागी होता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  आखाती युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून ESMA लागू

या मेळाव्यात ऍन्ट्रोपवार सिस्टिम प्रा.लि, जेएसडब्लू जेएफई इलेक्ट्रिकल स्टील,नाशिक, इनोवा रबर्स प्रा.लि., पेटीएम सर्व्हिस प्रा.लि. अशा 4 कंपन्या मेळाव्यात सहभागी होवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790