Breaking

नाशिक: नमो तीर्थकार महोत्सव स्थळास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट; विकास कामांची केली पाहणी

नाशिक। प्रतिनिधी: चांदवड येथे 5 ते 22 फेब्रुवारी, 2026 दरम्यान नमो तीर्थकार महोत्सव होणार आहे. या 15 दिवसीय महोत्सवास देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत.

या महोत्सवास जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 36 कोटी 65 लाखांच्या आराखड्यास मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अल्पसंख्याक विकास विभागाच्या धर्मक्षेत्र विकास योजना अंतर्गत मान्यता दिली आहे. सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सांगलीतील सराईत घरफोड्याला नाशिकमध्ये अटक; १५ लाखांचे सोने हस्तगत, १० घरफोड्यांची उकल

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज नमो तीर्थकार महोत्सव स्थळास भेट दिली. भेटीदरम्यान श्री. प्रसाद यांनी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करत विश्वस्तांशी सविस्तर चर्चा केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790