नाशिक: सिटीलिंकची ‘या’ नवीन मार्गावर बससेवा सुरु… जाणून घ्या सविस्तर…

नाशिक, दि. १ एप्रिल २०२६: शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगर परिवहन महामंडळ (सिटीलिंक)ने नवीन बसमार्ग क्रमांक २१० सुरू केला आहे. नाशिकरोड ते दिंडोरी असा हा मार्ग मेट्रो मॉल आणि तपोवन मार्गे धावणार असून, परतीच्या प्रवासातही दिंडोरी ते नाशिकरोड हा मार्ग तपोवन व मेट्रो मॉल मार्गेच राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

या नव्या मार्गामुळे विजय ममता, मेट्रो मॉल, तपोवन, पंचवटी डेपो कॉर्नर आणि दिंडोरी नाका या महत्त्वाच्या ठिकाणांना थेट जोडणी मिळाली आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.

बुधवार, १ एप्रिल २०२६ पासून या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली असून, साधारणतः दर तासाला बसची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नाशिकरोड, पंचवटी, तपोवन आणि दिंडोरी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

सदर मार्गावरील बसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
१) मार्ग क्रमांक २१०टी:

मार्ग – नाशिकरोड ते दिंडोरी मार्गे विजयममता, मेट्रो मॉल, तपोवन, पंचवटी डेपो कॉर्नर, दिंडोरी नाका.
वेळा – ०७:०५, ०८:०५, ०९:०५, १०:०५, ११:०५, १२:२०, १३:२०, १४:२०, १५:१५, १६:००, १७:००, १८:००, १९:००

मार्ग– दिंडोरी ते नाशिकरोड मार्गे तळेगाव, म्हसरूळ, दिंडोरी नाका, तपोवन, मेट्रो मॉल, विजय ममता.
वेळा – ०९:००, १०:००, ११:००, १२:००, १३:००, १४:२०, १५:१५, १६:१५, १७:००, १८:००, १९:००, २०:००, २१:००,

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790