नाशिक: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे ओझर विमानतळावर स्वागत !

नाशिक। दि. ११ डिसेंबर २०२५: भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे आज ओझर येथील एचएएल विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या आगमनावेळी जिल्हा प्रशासन व पोलिस दलाच्या वतीने विशेष स्वागत करण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी
जनरल द्विवेदी यांच्या आगमनानिमित्त विमानतळावर लष्करी दलाचे अधिकारी, एचएएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी जिल्ह्यात 99.84 टक्के मतदान- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790