नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 15 हजार 248 क्युसेक्स विसर्ग; गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक। दि. ८ जुलै २०२६: नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून आज दुपारी 12 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 15 हजार 248 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन विसर्ग 15 हजार 248 क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790