नाशिक येथे 9 एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिक। दि. ८ एप्रिल २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक मार्फत बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी गुरूवार 9 एपिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, बॉश लिमिटेड, नाशिक, जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, युवाशक्ती स्किल इंडिया प्रा.लि., एस्टेमो इंडिया प्रा. लि, एमएसएल ड्राइव्हलाइन सिस्टम्स लिमिटेड , बजाज सन्स लि, आनंद आय-पॉवर, ऐन्डुरंन्स टेक्नोलॉजीस, टपरिया टूल्स लि. , मदरसन ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग, धुमल इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि, किम्पलास पाइपिंग सिस्टीम्स लिमिटेड, एमडी इंडस्ट्रीज, नाशिक, मॉसडोर्फर इंडिया प्रा. लि, नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), वैष्णवी ऑटो प्रा. लि., फार्मा कंपनीज इन कोकंण टँड गोवा, ब्लुस्टर्स लि., टाटा कुमिन्स, गॅबरिल इंडिया प्रा.लि., SMS पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा, पुणे, रिंग प्लस ॲक्युवा, सिन्नर, एम.आर.एफ., धेज गुजरात, अमेझॉन, भिवंडी, इक्वीटास स्माॉल फायनान्स बँक अशा एकूण 27 पेक्षा जास्त आस्थापना 2 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांसह उपस्थित राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790