नाशिक: नोंदणी व मुद्रांक विभाागाच्या एकूण 3 हजार 958 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी

नाशिक। दि. ५ डिसेंबर २०२५: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजूरी प्रदान करण्याबाबतचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व वन विभागाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार सद्यस्थितीत मंजूर पदांची संख्या 3 हजार 958 झाली आहे. अशी माहिती नोंदणी महानिरिक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली असल्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1, नाशिक संदीप आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

राज्याचे मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी) यांच्या प्रयत्नाने विभागाच्या सध्या मंजूर 3 हजार 94 पदांपैकी 107 पदे निरसित करण्यात आली आहेत तसेच त्यामध्ये 965 पदे नव्याने निर्माण करून एकूण 3 हजार 958 पदांच्या सुधारित आकृतीबंधास महसूल व वन विभागाच्या 4 डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  'एअर शो'ला जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा… गंगापूररोडवरील वाहतूक मार्गात आज (दि.२३) बदल !

विभागातील नवीन दुय्यम निबंधक कार्यालयाच्या निर्मितीमुळे व दस्त संख्या तसेच इतर कामकाजामध्ये झालेली व्यापक वाढ लक्षात घेता सुधारित आकृतीबंधामुळे विभाग अधिक सक्षम व बळकट होईल. तसेच पर्याप्त मनुष्यबळामुळै शासनाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या इष्टांक पूर्तीसाठी मदत होऊन महसूलात वाढ होणार आहे व पर्यायाने नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा नोंदणी व मुद्रांक विभागाचा मानस सफल होण्यास मदत होणार असल्याचेही नोंदणी महानिरिक्षक श्री बिनवडे यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790