नाशिक: खळबळजनक; तरुणाची हत्या करीत प्रेत जाळण्याचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): खेडले, ता. दिंडोरी शिवारात किरकोळ कारणाहून झालेल्या वादात एकाचा अज्ञात शस्त्राने मारहाण करीत तरुणाची हत्या करण्यात आली असून, पूरावे नष्ठ करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी कोऱ्हाटे, ता. दिंडोरी येथील एका संशयीसह दोघांवर वणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सोमवार ता. ११ रोजी रात्री ८ ते रात्री ११ वाजेचे दरम्याण खेडले, ता. दिंडोरी शिवारातील फिर्यादी रंभाबाई हरी मेधणे, वय- 62 वर्षे यांचे राहते घराचे बाजुला थोड्या अंतरावर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली संशयीत किरण शरद कदम राहणार- कोहाटे ता. दिंडोरी याने त्याचा मित्र यांनी संदिप हरी मेधणे वय 41 राहणार- खेडले ता. दिंडोरी याचेशी किरकोळ कारणावरून वादीवाद करून घरातुन बाहेर घेवुन गेले.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

काहीतरी अज्ञात कारणावरुन संदीप मेधणे यास कोणत्यातरी हत्याराने मारहाण करीत जिवे मारून त्याचा खुन केला. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे प्रेत कोणत्यातरी ज्वलनशील पदार्थाने जाळुन टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत रंभाबाई हरी मेधणे यांच्या फिर्यादीवरुन वणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती घेवून अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बामळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे हे घटनेचा अधिक तपास करीत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790