नाशिक: अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास

नाशिक (प्रतिनिधी): एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक अत्याचार करणारा आरोपी रोहित संजय पवार (२०, रा. धात्रक फाटा, पंचवटी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले. न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांनी पवार यास २० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी (दि. २) सुनावली. दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये पीडित मुलाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: चहा विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक !

आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रोहित याने अल्पवयीन अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. यामध्ये त्याने पीडित मुलाला स्वतःच्या दुचाकीवर बसवून नेल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) व भादंवि ३६७/३७७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी साक्षीदार तपासत युक्तिवाद केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790