सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; २६ जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांचे वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात २६ जण जखमी झाले असून, यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात मंगळवारी (दि. २९ एप्रिल) सकाळी साडेनऊच्या सुमारास वणी-नांदुरी मार्गावरील मोहनदरी फाट्याजवळ घडला. वाशिम जिल्ह्याचे मूळ रहिवासी व सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले २६ ते ३० भाविक सुप्रो या मालवाहतूक वाहनातून सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. उतार आणि वळणाच्या रस्त्यावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने मदत करत जखमींना बाहेर काढले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि १०८ च्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल करण्यात आल्या.

नांदुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी मन्साराम बागूल, निलेश शेवाळे आणि नितीन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कळवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय बंगाळ यांच्या समन्वयाने आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

जखमींची संख्या अधिक असल्याने पंकज पाचपेंड (कळवण), चालक-मालक संघटना (नांदुरी) आणि खाजगी वाहन चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील, घनश्याम निकम यांनीही जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात मोलाची मदत केली.

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे वणी डॉक्टर्स असोसिएशनने पुढाकार घेतला. अध्यक्ष डॉ. अनिल पवार, डॉ. विराम ठाकरे, डॉ. योगेश पाटील, डॉ. प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात धाव घेत उपचारांची जबाबदारी सांभाळली. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक आणि कर्मचारी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

या अपघातात २६ भाविक जखमी झाले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जखमींची नावे:
आशाबाई खडसे, रोशनी बांगरे, प्रियांश जाधव, खुशी बोरकर, तनु खंदारे, अनिल बोरकर, आयोध्या जाधव, विलास पारवे, नंदा पारवे, ओम गायकवाड, गणेश बोरकर, हर्षदा बोरकर, शारदा बोरकर, अंबादास बोरकर, संजना हिवराळे, सखाराम पारवे, राधा पारवे, मनकणीबाई खरांदे, मनीषा बोरकर, गणेश बांगरे, छाया तांबे, एकनाथ हिरवाळे, शिवानी खंदारे, अर्चना पालवे, शोभा खंदारे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here