news

नाशिक: दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): येथील सिन्नर-घोटी महामार्गावर तालुक्यातील हरसुले येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार (दि.१७) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश डावरे (१७) व दुर्गेश डावरे (२२) असे मृत तरुणांचे नाव असून गणेश व दुर्गेश सकाळच्या सुमारास आपली पल्सर दुचाकी क्रमांक एम.एच.१५ जे. जी. ९६४५ ने कोनांबे येथून सिन्नरला निघाले होते.

यावेळी हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोर आले असता समोरुन विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे युवक ट्रकच्या पुढील बाजूला धडकून रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक महिला दिनानिमित्त १५ लाख मुलींना आत्मरक्षण आणि योगाचे धडे!

दरम्यान, यावेळी डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका चालक पुरुषोत्तम भाटजिरे यांना संपर्क साधून जखमी तरुणांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दोघाही तरुणांना तपासून मृत घोषित केले. ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790