नाशिक: सायबर क्राईममधून बोलत असल्याचे भासवून ३६ लाखांना गंडा !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई सायबर क्राईमची धमकी देत शहरातील एकास तब्बल ३६ लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्यांनी आधार कार्डच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगसह ड्रग तस्करीत आणि चोरी प्रकणात तुमचा सहभाग आढळून आल्याची बतावणी करत ही फसवणूक केली आहे. ही रक्कम वेगवेगळया बँक आणि वॉलेट खात्यात वर्ग करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नामांकित व्यक्तीशी गेल्या मे महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. कुलदीप सिंग नावाच्या व्यक्तींनी हा संपर्क साधला होता. मुंबई सायबर क्राईममधून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी आधार कार्ड पडताळणीत तुमचा मनी लॉन्ड्रिंगसह ड्रग तस्करी आणि चोरीत तुमचा सक्रीय सहभाग असल्याचे आढळून आल्याची बतावणी करीत सदर इसमास धमकावले.

यावेळी तुम्हाला यातून सुटका करावयाची असल्यास तुमच्या खात्यावर असलेली रक्कम तात्काळ आम्ही सांगू त्या बँक व वॉलेट खात्यात वर्ग करण्याचे सुचविण्यात आल्याने ही फसवणुक झाली. दमदाटी करीत धमकविल्याने भेदरलेल्या व्यक्तीस भामट्यांनी तब्बल ३५ लाख ६४ हजार २३ रूपयांची रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

दि.५ ते ९ मे दरम्यान ही फसवणुक झाली आहे. संशयितांनी धमकावून ही रक्कम आपल्या बँक खात्यात वर्ग केली असून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सदर प्रतिष्ठीत व्यक्तीने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत. (फिर्यादीच्या विनंतीवरून फिर्यादीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790