नाशिक। दि २२ नोव्हेंबर २०२५: कुलाबा पोलिस स्टेशनमधून बोलत असून, तुम्ही नरेश गोयल मनी लॉण्ड्रिंग केसमध्ये सहभागी असल्याचे खोटे सांगून अटक टाळण्यासाठी विविध बँक खात्यात दहा लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाला ऑनलाइन गंडा घातला.
माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये सायबर पोलिस ठाण्यात सायबर भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी (दि. २१) दाखल करण्यात आला. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फिर्यादीस फोन आले. तसेच चॅटिंग करून मनी लॉण्ड्रिंगच्या नावाखाली धमकी दाखविण्यात आली.
आपल्याला या प्रकरणात अटक करावी लागेल. अटक टाळण्यासाठी पहिले तीन लाख व नंतर सात लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सायबर भामट्यांनी भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
![]()


