नाशिक: घरपट्टी-पाणीपट्टी अपडेटच्या नावाखाली फसवणुकीचा प्रयत्न; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक। दि. ७ एप्रिल २०२६: घरपट्टी आणि पाणीपट्टीचे इंडेक्स क्रमांक अद्ययावत करण्याच्या नावाखाली नागरिकांना नाशिक महापालिकेच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महानगरपालिकेने तातडीने कारवाई करत संबंधित भामट्यांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

मागील काही दिवसांत नागरिकांच्या मोबाईलवर नाशिक महानगर पालिकेचा अधिकृत लोगो वापरून 6005481746, 6297019792 या अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून इंग्रजी भाषेत ‘शहरातील नागरीकांची प्रलंबित पाणीपट्टी व घरपट्टी बिले भरली नसल्याने, त्यांचे कनेक्शन खंडीत करण्यात येईल तसेच बिले अपडेट करण्यासाठी हेल्पलाईन 6297019792 अंकित अग्रवाल यांचेशी संपर्क करण्याची धमकीवजा मॅसेज शहरातील नागरिकांमध्ये प्रसारित करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वर: कुंभमेळ्याची नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले. दोन्ही व्हॉट्सअपधारकांने नाशिक महानगरपालिकेची ओळख चोरून, पालिकेचा अधिकृत लोगोचा व्हॉट्सअपच्या डिपी वापरून, खोटा संदेश पसरविल्याने, दोन्ही व्हॉट्सअपधारकविरूध्द महापालिकेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790