Amazon

नाशिक: एटीएम कार्ड बदलून ६७ हजारांची फसवणूक; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

नाशिक | दि. २७ जुलै २०२६: सातपूर परिसरात एटीएममध्ये व्यवहार करताना कार्ड बदलून नागरिकांच्या बँक खात्यांतील रक्कम लंपास करणाऱ्या भामट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सातपूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

पहिल्या घटनेत सातपूर बस स्थानकाजवळील एटीएममध्ये व्यवहारासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचे एटीएम कार्ड तिघा अज्ञात भामट्यांनी चलाखीने बदलल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, २४ जुलै रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून तीन वेळा प्रत्येकी १० हजार रुपये आणि एकदा ७ हजार रुपये, असे एकूण ३७ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार बेंडकुळे करत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या 'या' विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल...

दुसऱ्या घटनेत पुरुष फिर्यादी हे २४ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास सातपूर एमआयडीसी परिसरातील एटीएममध्ये व्यवहार करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड बदलल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यातून तीन व्यवहारांद्वारे प्रत्येकी १० हजार रुपये, असे एकूण ३० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

दोन्ही प्रकरणांमध्ये सातपूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790