सिल्वासा खून प्रकरणातील संशयितांना नाशिकमधून अटक !

नाशिक। दि. २० जून २०२५: गुजरातमधील सिल्वासा, दमण दीव येथील खूनप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह इतर सहा संशयितांना घटनेच्या २४ तासात नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शहरातील गंगापूर नाका येथे पकडले. दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून खुनाची घटना घडली होती. मंगळवारी दि.१७) सायंकाळी खून करून संशयितांनी नाशिक गाठले. गुरूवारी दि (१८) सायंकाळी ते पोलिसांच्या तावडीत आले.

बुधवारी (दि.१८) रात्री गुन्हे शाखा युनिट-१ कडील सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, उमेश कोळी, योगीराज गायकवाड, विशाल काठे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, मिलिंदसिंग परदेशी, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, चालक किरण शिरसाठ गस्त घालत असताना गंगापूर नाका येथे एक जण कारमध्ये (क्र. डीएन ०९ एल २५८७) संशयितरीत्या फिरत असताना आढळून आला. पोलिसांनी कार अडविली असता कारमध्ये पाच ते सहा जण होते. त्यावरून विचारपूस केली असता संशय बळावला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

अटक केलेल्या संशयितांची नावे:
आनंद शेषनाथ सेठ (२७), संतोष अजय जाधव, (३६) मितेश/मोटू अमृतभाई हलपती (३२) प्रेम शरद रामपूरकर (२१) कौशल अरविंद आचार्या (३४) मोंटूकुमार सुचित पासवान (३५), सर्व रा. सिलवासा, दादरा नगर हवेली (गुजरात).

नक्की काय घटना घडली होती:
अटकेतील आनंद सेठ यास विचारपूस केली असता त्याने हकीगत सांगितली. “२६ जून २०२४ रोजी आनंदचा मित्र कुणाल याने आनंदवर गोळ्या फायरिंग करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून आनंद कसाबसा बचावला. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी कुणालने आनंदला पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली. याच रागातून मी मित्राच्या सहकार्याने कुणालचा खून केला अन् आम्ही नाशिकमध्ये लपून बसलो.”

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

‘ती’ धमकीच ठरली कुणालसाठी घात:
तू यापूर्वी वाचलास; पण आता वाचणार नाही, अशी धमकी कुणाल ऊर्फ जानकीनाथने आनंदला दिली होता. याची भीती आनंदला होती. याच भीतीतून मित्रांच्या मदतीने खुनाचा बेत आनंदने आखला. आनंद हा दि.१७ जून रोजी सायंकाळी मित्र मोटू ऊर्फ मितेश हलपती, संतोष जाधव व अन्य एक जण असे कारमध्ये सिलवासा येथे गेले होते. तेथे कुणालचा एका रिक्षाचालकाशी वाद सुरू होता. कुणाल यास आनंदसह त्याच्यासोबतच्या मित्रांनी समजावून सांगितले. त्याला त्या भांडणातून सोडवून कारमध्ये घेऊन एचआर ढाबा गाठला. तेथे बाजूला मोकळ्या जागेत घेऊन गेले. तेव्हा मी मला दिलेल्या धमकीचा बदला काढत कुणाल एकटा तावडीत असल्याचा फायदा घेत त्याच्या हाता-पायावर, कंबरेवर हाताने, पायाने मारले तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. व तेथून आम्ही पळ काढल्याची कबुली कुणालने दिली. या मारहाणीत कुणालचा मृत्यू झाला होता.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here