क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ आज शेवटचा दिवस; ४ दिवसात १६५०० नागरिकांनी दिली भेट !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): २६ ऑक्टोबरपासून नाशिक मधील ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ मधील प्रदर्शनाचा चौथा दिवस म्हणजे रविवार खऱ्या अर्थाने डील क्लोज करण्याचा दिवस होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात प्राथमिक पाहणी केल्यानंतर साईट व्हिजिट करून रविवारी अनेक ग्राहकांद्वारे बुकिंग कन्फर्म करण्यात आले.

प्रदर्शनाचा सोमवार (30 ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस असून या दिवशी देखील अनेक बुकिंग कन्फर्म होणार असल्याचे प्रदर्शनात सहभागी झालेल्या बांधकाम व्यवसायिकानी सांगितले. प्रदर्शनाच्या पहिल्या ४ दिवसात १६५०० नागरिकांनी भेट दिली असून २०३ बुकिंग झाले आहे.

शहराची बदलती स्कायलाईन:
बांधकाम नियमात झालेल्या अनेक बदलांमुळे तसेच नवीन तंत्रज्ञानमुळे आज नाशिक मध्ये सुमारे ३० ते ३५ मजले इमारतीचे निर्माण होत असल्याने शहराची स्कायलाईन बदलत आहे. कधीकाळी एक अथवा दोन मजली टुमदार घराचे नाशिक शहर आता उंच इमारतीचे शहर होत आहे. अश्या हाय राईज इमारती मध्ये घर घेण्या कडे देखील अनेकांचा कल दिसून आला आहे. नाशिक मध्ये सर्वांनी पर्यावरणाशी समतोल राखून संतुलित विकास करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीस अनेक जण उत्सुक असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ दरम्यान झाले इतके टक्के मतदान…

प्रदर्शनास मिळालेल्या प्रतिसादामुळे सकारात्मक आर्थिक संकेत:
बांधकाम उद्योग हा जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाते. एक इमारत बांधताना ५० हून अधिक विविध उत्पादने आणि सेवा यांची गरज असते. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते. प्रदर्शना चा प्रतिसाद प्रदर्शन कालावधी नंतर पुढील कमीतकमी ६ महिने राहतो या मुळे आगामी कालावधीत नाशिक मध्ये सकारात्मक आर्थिक वातावरण राहणार हे निश्चित झाले असल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक अंजन भालोदिया यांनी नमूद केले

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

आंतरराष्ट्रीय दर्जास साजेसे:
प्रदर्शनाचे रूप आंतरराष्ट्रीय स्तरास साजेसे असून नीटनेटके आयोजन, आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल, पार्किंग ची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्सची रेलचेल या मुळे पसंतीस उतरले असून कोणत्याही शहराच्या निर्मितीमध्ये तेथील बांधकाम व्यावसायिक यांची भूमिका मोलाची असते, याची प्रचिती येथे भेट दिल्यावर येत असल्याचे सहसमन्वयक ऋषिकेश कोते व नितीन पाटील यांनी नमूद केले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

आज (सोमवारी) होणार समारोप:
आज दिनांक ३० ऑक्टोबर (सोमवार) रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, मानद सचिव गौरव ठक्कर, खजिनदार हितेश पोद्दार, सह सचिव सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, अनिल आहेर, मनेजिंग कमिटी मेंबर मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा हे प्रयत्नशील आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790