नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा आज सकाळपासून पुन्हा ठप्प झाली आहे. ४५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याआधीही सिटी लिंक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकल्याने त्यांनी आंदोलन केले होते. आता पुन्हा एक महिन्याचा पगार मिळाला नाही आणि अन्य काही मागण्यांसाठी आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यामुळे नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
यापूर्वी तीन महिन्यापासून पगार थकला होता. तर, चालू महिन्याचाही पगार आता थकला असल्याने सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे व दोन वर्षांचा दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे बुधवार पहाटेपासूनच सिटीलिंकच्या एकुण ४५० पेक्षा जास्त वाहकांनी संपाची हाक दिली असल्याने तपोवन बस डेपो तसेच नाशिक रोड बस डेपोतून एकही बस रस्त्यावर धावली नाही.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नसल्यामुळे पुन्हा एकदा कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, वाहकांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहील अशी भुमिका घेतली आहे.