नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्यावतीने सातपूर येथील कडेपठार रोड, गंगापूर डॅम पंपिंग तसेच कॅनॉल रोडवरील साई गार्डन सोसायटी, शिवाजी नगर स्कूलजवळील सोसायटीनजीक काम पूर्ण झाले असून इतर काही ठिकाणी कामे सुरू असल्याने शहरात रविवारीही (दि. २) कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल असे पाणीपुरवठा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व जलशुद्धीकरण बंद झाल्याने शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे व इतर संबंधित कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मनपाच्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेण्यात आला आहे.
सदर पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र यांना रॉ-वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. तसेच मुकणे रॉ-वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथून एक्स्प्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे नवीन बीपीटीचे काम सुरू असून, सदर कामात अडचणीचे ठरणाऱ्या ३३ केव्ही ओव्हर हेड एच.टी. लाइनची महावितरणच्या उपस्थितीत शिफ्टिंग करण्यात आले आहे.
सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे व इतर संबंधित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्रिमूर्ती चौक, तोरणा नगर, जुने सिडको, खांडे मळा, उपेंद्र नगर या परिसरात पाणी नसल्याने हाल झाले.