🛑 महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत हे दोन दिवस पाणीपुरवठा नाही

नाशिक कॉलिंगच्या सर्व बातम्या ताबडतोब मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईन करा !

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत हे दोन दिवस पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी विभागातील प्र.क्र.03, येथील हिरावाडी येथील साईनगर (सिध्दीविनायक जलकुंभ) जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी गोपाळनगर पंपिंग येथे हेवी लिकेज झालेले असल्याने सदरचे लिकेज तात्काळ बंद करणे कामी उर्ध्ववाहिनीचे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:  नाशिक पोलीस आज घेणार ललित पाटीलचा ताबा; पथक मुंबईत दाखल

हे काम सोमवार दि. 15 नोव्हेंबर, रोजी हाती घेण्यात येणार असल्याने साईनगर (सिध्दीविनायक जलकुंभ) जलकुंभावरुन होणारा प्र.क्र.01, मधील शिवगंगानगर, रामेश्वरनगर व परिसर, प्र.क्र.04, मधील तलाठी कॉलनी, शिवनगर परिसराचा सोमवार दि. १५ नोव्हेंबर, रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.

तसेच मंगळवार दि. १६ नोव्हेंबर रोजी प्र.क्र.01, मधील शिवगंगानगर, रामेश्वरनगर व परिसर, प्र.क्र.04, मधील तलाठी कॉलनी, शिवनगर परिसराचा व प्र.क्र.03, सिध्दीविनाय टाऊन शिप, अयोध्या नगरी 1 व 2, सिध्देशवरनगर, ठक्कर रो.हाऊस, ठाकरे मळा, सावतानगर, साईनगर, गजानन कॉलनी, दत्तचौक, कळसकर नगर, रासविहारी रोड लगतचा परिसर व म्हाडा बिल्डींग भन्साळी मळा इत्यादी परिसरातील सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

हे ही वाचा:  उत्तरेमध्ये हिमवृष्टी, वाऱ्यामुळे राज्यात धुक्याची चादर: उद्यापासून अजून वाढेल थंडीचा कडाका

याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790