Live Updates: Operation Sindoor

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत गुरुवारी (दि. ७ एप्रिल) पाणीपुरवठा नाही

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत गुरुवारी (दि. ७ एप्रिल) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेने महत्वाची सूचना दिली आहे.

नाशिक शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशीच पाण्याचे नियोजन करावे असे सांगण्यात आले आहे.

सातपुर पाणी पुरवठा विभागातील 500 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. सिमेंट पाईपलाईन ध्रुवनगर, बळवंत नगर, गणेश नगर, रामराज्य, नहुष जलकुंभ, भरणारी पिण्याची थेट पाईप लाईनला खालील ठिकाणी गळती सुरु झालेली आहे.

आणि पाणी वाया जात आहे. त्यामुळे कार्बन नाका, मेघा इंडस्ट्रीज लगत 500 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. सिमेंट पाईपलाईन आणि मोतीवाला कॉलेज, महाराष्ट्र मार्बल, ध्रुव नगर डि.पी. रोड लगत 500 मी.मी. व्यासाची सिमेंट पाईपलाईन या ठिकाणी दि. 07/04/2022 रोजी पाईप गळती दुरुस्तीचे कामे सकाळी 9.00 वाजता हाती घ्यावयाचे आहे. त्यामुळे सातपुर विभागातील खालील प्रभागात गुरुवार दि. 07/04/2022 रोजी सांयकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व दि.08/04/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

👉 हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

सातपूर विभाग व पश्चिम प्रभाग:

प्रभाग क्र.7 (भागश:):- नहुष जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :-  नहुष सोसायटी परिसर, पुर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर,गीतांजली सोसायटी, पंपीग स्टेशन, शांती निकेतन इत्यादी परिसरात,

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10355,10343,10341″]

प्रभाग क्र.8 :- बळवंत नगर  जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :- बळवंत नगर, रामेश्वर नगर, सिरीन मिडोज, सोमेश्वर कॉलनी,  आनंद नगर, खांदवे नगर, सदगुरु नगर, पाटील लॉन्स परिसर, आनंदवल्ली, आनंदवल्ली गांव व परिसर, सावरकर नगर, शंकर नगर,  शारदानगर, पाम स्प्रिंग,  कल्याणी नगर, चित्रांगण सोसायटी, मते नर्सरी रोड, नरसिंह नगर,  पंचम सोसायटी, राम नगर, दाते नगर,  अयोध्या कॉलनी, भगुरकर मळा इ. परिसर.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

गणेश नगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर:- गणेश नर, कामगार नगर, गुलमोहर कॉलनी, काळे नगर, सुयोग कॉलनी, पाईपलाईन रोड परिसर, गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर विवेकानंद नगर, निर्मला विहार

प्रभाग क्र.9 (भागश:) :- ध्रुव नगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :-मोतीवाला कॉलेज परिसर, गुलमोहर कॉलनी  परिसर, शिवशक्ती कॉलनी, तुकाराम क्रिडांगण परिसर व नवीन ध्रुवनगर परीसर इत्यादी  

प्रभाग क्र. 12 (भागश:):-  रामराज्य जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :-  कल्पना नगर, मॉडेल कॉलनी, कृषी नगर परिसर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल, गंगापुर रोड स्वामी समर्थ मंदीर परिसर, डिसुझा कॉलनी, गंगापुर रोड परिसर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790