नाशिक शहरातील पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्वाचा निर्णय…

नाशिक शहरातील पाणीकपातीबाबत महापालिकेचा महत्वाचा निर्णय…

नाशिक (प्रतिनिधी): तीन आठवड्यांनंतर अखेर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस लागू केलेली पाणी कपात सोमवारी (दि. २ ऑगस्ट २०२१) पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यानंतर रद्द केली. धरणांत जरी मुबलक साठा असला तरी अद्यापही ती पूर्ण भरलेली नसल्यामुळे नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करावा, अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी सात जून रोजी पावसाचे आगमन होत असते. सर्वसाधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस जोर धरतो. यंदा मात्र २० जुलै ओलांडल्यानंतर ही पावसाने कृपा दाखवली नव्हती. त्यामुळे  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहासह मुकणे व दारणा(चेहडी बंधारा) धरणातील मंजूर पाणी आरक्षण संपुष्टात आले होते.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ दरम्यान झाले इतके टक्के मतदान…

वालदेवी संगमावरील दूषित पाण्यामुळे दारणेतील आरक्षित पाणीसाठा महापालिकेला उचलता येत नव्हता. शहरात पाणीकपात लागू करण्यासंदर्भात दोनदा प्रस्ताव आल्यानंतरही महापौर सतीश कुलकर्णी आढावा घेण्यापलीकडे दुसरा ठोस निर्णय घेऊ शकले नव्हते. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून महापालिकेेने गेल्या महिन्यात शहरात पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

२१ जुलै रोजी बकरी ईद असल्याने गुरुवारी २२ जुलैपासून ही पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दोन आठवडे दर बुधवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. इकडे, पाणी कपातीचा निर्णय लागू झाला नाही तोच वरुण राजाने जोरदार कृपा दाखवली. परिणामी गेल्या दहा दिवसात गंगापूर धरण ८० टक्क्यांवर भरले. त्यामुळे या धरणातून सुमारे पाच हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग केला गेला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

मुकणे धरणाचा साठा देखील ५१ टक्क्यांवर गेला आहे. दारणा धरणही ७८ टक्क्यांवर भरल्याने पाणीकपात रद्द करण्यासाठी नगरसेवकांची मागणी वाढली होती. पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापौर व आयुक्तच घेतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी नमूद केल्यानंतर महापालिका आयुक्त जाधव यांनी सोमवारी(दि.२) खातेप्रमुखांच्या बैठकीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर पाणीकपात तूर्त मागे घेण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790