नाशिककरांनो मंगळवारच्या (दि. १७ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाज कल्याण, इएसआयएस हॉस्पिटल (सातपूर) आणि सिडको युपीएचसी यांचा समावेश आहे, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र कोविशिल्डच्या मंगळवारच्या डोसबद्दल कुठलीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. कोविशिल्डबाबत माहिती मिळताच ती ह्याच ठिकाणी अपडेट करण्यात येईल. नाशिकच्या कोरोनाबाधीतांचा आकडा आज थोडा कमी झाला असला तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १६ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू