Amazon

नाशिक: कोयत्याने हल्ला करुन जबरी चोरी; तीन आरोपी जेरबंद

नाशिक। दि. १४ ऑक्टोबर २०२६: देवळाली कॅम्प परिसरात जुन्या वादातून तरुणावर कोयता, फायटर आणि चामडी पट्ट्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या, तसेच तरुणाला मारहाण करून सोन्याची चेन आणि रोख रक्कम लुटल्याच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांतील तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट २ ने अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; दोन संशयितांना अटक

पहिल्या गुन्ह्यातील संपत शंकर वायकर (वय २३) आणि तुषार ऊर्फ बोक्या सुनील कोकणे (वय २२) यांना शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. तर जबरी चोरीच्या गुन्ह्यातील प्रेम ऊर्फ साई मोनू राणा (वय १९) याला देवळाली कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली.

जुन्या वादातून तरुणावर हल्ला:
२४ सप्टेंबर रोजी जुन्या स्टेशनवाडी स्मशानभूमीजवळ जुन्या वादातून एका तरुणावर कोयता, फायटर आणि चामडी पट्ट्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी शिर्डीतून ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरूच; पारा सलग सात दिवस ३५ अंशांपुढे

मारहाण करून सोन्याची चेन, रोकड लुटली:
दुसऱ्या घटनेत पिझ्झाची ऑर्डर देण्याचे काम करणाऱ्या एका तरुणाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावण्यात आली होती. या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित प्रेम ऊर्फ साई मोनू राणा याला देवळाली कॅम्प येथून अटक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला गती- आयुक्त शेखर सिंह

गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790