🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

आज (दि. ४ मे) नाशिकमध्ये लसीकरण पूर्णत: बंद !

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेने गुरुवारी व शुक्रवारी उधार-उसनवार कोरोना लसीकरण पार पाडल्यानंतर शनिवारी व रविवारी लसीकरण बंद ठेवले होते. मात्र, सोमवारी तारेवरची कसरत करत अवघ्या साडेचारशे डोसवर १८ते ४५ वयोगटातील लसीकरणाची औपचारिकता पार पाडली. अशातच दुसरा डोस घेणाऱ्यांची गर्दी ही अधिक असल्यामुळे १८ ते ४५ वयोगटातील तुरळक लोकांनाच लस देता आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक !

दरम्यान, मंगळवारी लसीकरण पूर्णपणे बंद ठेवले जाणार असून दिवसभरात लसीचा साठा आल्यास बुधवारबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाणार असल्याची माहिती लसीकरण मोहिमेच्या समन्वय डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याचे बघून १५ एप्रिलनंतर पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. महापालिकेने स्वत:चे २७ तर खासगी २२ केंद्र, शिवाय औद्योगिक वसाहतीत ९ ते १० कॅम्प आयोजित करून लसीकरणाला वेग दिला. मात्र, लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर आता उपलब्धतेची अडचण निर्माण झाली आहे. महापालिकेला मागील आठवड्यातील गुरुवारपासून लसींची टंचाई भासत आहे.

🔎 हे वाचलं का?:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिक विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

जिल्हा परिषदेकडून ११ हजार लसी उधार-उसनवर घेतल्यानंतर शुक्रवारी (दि. २९) शिल्लक साठ्यावर किरकोळ लसीकरण झाले. शनिवार व रविवारी लसीकरण पूर्णपणे बंद राहिले. सोमवारी लसींचा साठा येईल अशी अपेक्षा असताना ती फोल ठरली. शिल्लक साडेचारशे कोविशिल्डच्या डोसमधून सिडकोसह काही भागात लसीकरणाची औपचारिकता पार पाडली. कोव्हॅक्सीनचे शंभरच दोस असल्यामुळे दुसऱ्या दोसची मागणी करणाऱ्यांचे लसीकरण झाले. आतापर्यंत कोविशिल्डचे दोन लाख ५१ हजार ६५० तर कोव्हॅक्सीनचे ४३ हजार ९६० डोस प्राप्त झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790