नाशिक: शुक्रवारी (दि. २३) होणाऱ्या ‘सूर्यकिरण एअर शो’च्या वेळेत बदल

नाशिक। दि. २२ जानेवारी २०२६: कमी दृश्यमानता (Low Visibility) लक्षात घेता शुक्रवार २३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर्यकिरण’ (SKAT) एअर शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम आता दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळी सकाळी ११ वाजेपासून प्रवेश खुला केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

ज्या प्रेक्षकांनी आपली आसन व्यवस्था राखीव केली आहे, त्यांनी प्रवेश प्रक्रिया व आसन व्यवस्थेची सुरळीत अंमलबजावणी होण्यासाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. तसेच प्रेक्षकांनी स्वतःच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, टोपी व सनग्लासेस सोबत ठेवावेत. कार्यक्रमस्थळी सुरक्षा तपासणी तसेच आपत्कालीन सेवांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचे चित्तथरारक प्रात्यक्षिक प्रेक्षकांना स्पष्टपणे पाहता यावे, या उद्देशानेच कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790