नाशिक: शहरातील ‘या’ परिसरात वाहतूक मार्गात बदल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): श्रावण मासानिमित्त सोमवारी व शनिवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी रामकुंड व कपालेश्वर मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी; घाटमाथ्यावर आज ‘यलो अलर्ट’

श्री कपालेश्वर मंदिर, रामकुंड, गंगाघाट परिसरात दर सोमवारी ५, १२, १९, २६ ऑगस्ट रोजी तसेच दर शनिवारी १०, १७ व २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, खांदवे सभागृहकडून कपालेश्वर मंदिर, सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिर, ढिकले वाचनालय ते कपालेश्वर मंदिर या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल असेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसरुळला एसटी बस- दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वरील मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत पोलिस प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790