नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथे गुढी पाडव्यानिमित्ताने बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. त्यामुळे उद्या (ता. ९) त्र्यंबक रोडवरील सातपूर गाव येथे नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी बारा गाड्या ओढण्याच्या पारंपरिक कार्यक्रम होणार आहे.
त्यामुळे, त्र्यंबक रोडवरील दोन्ही बाजुची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची अधिसूचना शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.
सातपूर गावात गुढी पाडव्यानिमित्ताने पारंपरिक यात्रा भरते. तसेच, सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचाही कार्यक्रम होत असतो. सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूकीची कोंडीही होते. तसेच, त्र्यंबकरोडवरच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो.
या पार्श्वभूमीवर त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल ते महिंद्रा सर्कल या मार्गावरील दोन्ही बाजुकडील वाहतूक दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद असणार आहे. यामुळे वाहनचालकांनी वाहतूक शाखेने दिलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
🛑 प्रवेश बंद:
त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल ते महिंद्रा सर्कल दुहेरी रस्ता वाहतूकीसाठी बंद
पर्यायी मार्ग:
👉 त्र्यंबककडे जाणारी वाहतूक सकाळ सर्कल – अचानक सर्कल – गंगामाई सोसायटी – स्वराज्य चौक – नाशिक ऑक्सिजन चौक – जलतरण तलाव समोरून गांगुर्डे चौकातून मार्गस्थ
👉 नाशिककडे येणारी वाहतूक गांगुर्डे चौक – नाशिक ऑक्सिजन चौक – जलतरण तलावसमोरून – गंगामाई सोसायटी – स्वराज्य चौक – अचानक चौकातून मार्गस्थ.