नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
सेवाकुंज ते गजानन चौक ६०, तर अमरधाम ते शिवाजी चौक रास्ता ९० दिवस बंद
नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटीकडून गुरुवार (दि. १८) पासून पंचवटीतील सेवाकुंज ते गजानन चौकादरम्यानच्या ४५० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण, मलवाहिकेचे काम हाती घेण्यात आले आहे.
याशिवाय अमरधाम ते शिवाजी चौक दरम्यानच्या १६० मीटर रस्त्याचेही डांबरीकरण, पावसाळी गटार योजनेचे काम होणार आहे. यासाठी सेवाकुंज ते गजानन चौकदरम्यानचा रस्ता ६० दिवस, तर अमरधामकडील रस्ता ९० दिवस बंद करण्यात येत आहे.
या दोन्ही रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूस सर्वप्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करण्यात आले आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात आदेश जारी करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यायी मार्ग असे:
सेवाकुंज ते गजानन चौक या मार्गावरील वाहतूक या रस्त्याच्या पूर्व बाजूकडील समांतर रस्त्याने व पश्चिम बाजूकडील समांतर रस्त्याने वळवण्यात आली आहे.
अमरधाम ते शिवाजी चौकादरम्यानची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू राहणार आहे.
असे असेल नियोजन:
दोन्ही रस्त्यांवर बॅरिकेड्सने प्रवेश बंदी
नो पार्किंग झोन:
दोन्ही रस्त्यांवर दोन वाहतूक पोलिस कर्मचारी नियुक्त