Breaking News: नाशिकमध्ये पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात मागच्या काही महिन्यांपासून ड्रग्जच्या घटना सातत्याने समोर येत आहे, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उध्वस्त करत ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्या होत्या. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एमडी ड्रग्ज सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा 20 ग्रॅम वजनाचे एम.डी. ड्रग्ज जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित निखिल बाळु पगारे (वय 29, रा. दादाज अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) व कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराज (वय 22, रा. भगवती चौक, उत्तमनगर, सिडको) हे दोघे जण संगमनत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी 1 लाख रुपये किंमतीचा व 20 ग्रॅम वजनाचा एम.डी. ड्रग्ज या अमली पदार्थाची विक्री करण्याकरीता स्वत:च्या कबजात बेकायदेशीररित्या बाळगताना मिळून आले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने पाथर्डी शिवारातील हॉटेल स्वरांजलीच्या पाठिमागे दामोदर नगर येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790