
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये स्थानिक स्तरावर ही एकमेव अशी स्पर्धा भरवली जाते, ज्यात खेळाडूंचा लिलाव पद्धतीने बोली लावण्यात येते व जी किंमत त्यांना आली त्यांना ती किंमत रोख स्वरूपात देण्यात येते.
नाशिक केन्सिंगटन चॅम्पियन लीग स्पर्धेत संघर्षपूर्ण झालेल्या लढतीत ओशन शटलर्स संघाने विजेतेपद पटकावले तर स्मॅश स्क्वाड यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. शनिवारी सकाळी ८.०० वाजता नाशिकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, केन्सिंगटन क्लबचे संचालक विक्रांत मते यांच्या उपस्थितीत स्पर्धांचा शुभारंभ झाला.
सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारोप इनोवा रबर प्रा.लि.चे सचिन अंबर्डीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाविक ग्रुपचे पिंकेश शहा, रवी पवार, पराग एकांडे, मुकेश पवार, दिनेश अडसरे, आकाश कुलकर्णी, हर्षल टेंभुर्णीकर, आशिष तोरवणे आदी उपस्थित होते तसेच पारितोषिक वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत खालील प्रमाणे एकूण सहा संघांनी भाग घेतला १) नाशिक सुपर किंग- पिंकेश शहा व मुकेश पवार २) ओशन शटलर्स – ललत थत्ते व दिनेश अडसरे ३) रॅायल मराठा – कौस्तुभ पवार व आशिष तोरवणे ४) आदित्य शटलर्स – आदित्य कासार ५) स्मॅश स्क्वाड – निखिल डिंडाळे व डॉ. अल्पेश पाटील ४) तेवा शटलर्स – करण गुप्ता व प्रणव गाडगीळ
या स्पर्धेत ट्रम्प गुणांच्या पद्धतीने सर्व साखळी सामन्यात ओशियन शटलर्स व स्मॅश स्क्वड या दोन्ही संघांनी सर्वात जास्त गुण मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तब्बल दोन तास चाललेल्या या अंतिम लढतीत खेळल्या गेलेल्या ९ दुहेरी पैकी सरळ झालेल्या पाच सामन्यांमध्ये ओशन शटलर्स ५-० ने आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेत विजेत्याला रु. एक लाख पन्नास हजार रुपये व उपविजेत्याला रु. पंच्यात्तर हजार रोख रुपये असे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुकेश पवार, दिनेश अडसरे, रवी पवार, हर्षल टेंभुर्णीकर, आकाश कुलकर्णी व आशिष तोरवणे आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच किशोर सिंग व यांचे सहकारी यांनी सांभाळली तसेच या स्पर्धेकरिता इनोवा रबर प्रायव्हेट लिमिटेड नितीन धात्रक इन्व्हेस्टमेंट, टोटल स्पोर्ट्स फिटनेस, डॉ.जे. सुंदरराजन, साई हेल्थ केअर, आड लाईफ स्पोर्ट्स, यांचे सहकार्य लाभले
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790