नाशिक शहरात शनिवारी (दि. 20 जून) 45 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा मृत्यू

नाशिक शहरात शनिवारी (दि. 20 जून) 45 कोरोनाबाधित रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात शनिवारी (दि. २० जून २०२०) रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात एकूण ४५ रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोना रुग्ण:-११०१ एकूण मृत्यू:-५६(आजचे मृत्यू-५), घरी सोडलेले रुग्ण :- ४७६ उपचार घेत असलेले रुग्ण:- ५६९ अशी संख्या झाली आहे.

शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पिंपळगाव बसवंत (आहेर गाव रस्ता)-१, काझीपुरा-१, नाईकवाडीपुरा-१, खडकाळी (रसुलबाग)-१, कोकणीपुरा-२, मखमलाबाद गाव-१, पिंजरघाट-३, अंबड लिंक रोड (सातपूर)-२, शरणपूर रोड-१, सातपूर-१, जाधव संकुल-१, चव्हाण चौक (जुने नाशिक)-१, दुध बाजार-१, वडाळा रोड-१, द्वारका-१, भद्रकाली पोलीस स्टेशनमागे-१, सिडको-१, पेठ रोड-३, पेठ रोड (सप्तरंग मागे)-१, बागवानपुरा-१, अमोल पार्क (हनुमानवाडी, पंचवटी)-१, फुले नगर-१, इतर-१, गोसावी वाडी (नाशिकरोड)-५, मुमताज विला (पांडे नगर)-३, वडाळा चौक-१, दिपाली नगर-२, विमलनाथ प्राईड (दिंडोरी रोड)-१, लक्षमण प्लाझा (गणेशवाडी)-२, जनरल वैद्य नगर (नाशिक-पुणे रोड)-१, पखालरोड-१ अशा एकून ४५ रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात ३२ किलो गांजा जप्त; पिता पुत्रावर कारवाई

तर एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे:

बुधवार पेठ येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल १४ जून २०२० रोजी प्राप्त झाला होता त्यांचे दिनांक १३ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: तोतया आयपीएसला पोलिसांनी केले गजाआड; पोलीस गणवेश, वॉकी टॉकीसह कागदपत्रे जप्त !

फकिरवाडी, कथडा येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल १५ जून २०२० रोजी प्राप्त झाला. त्यांचे दिनांक १९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

नानावली द्वारका येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक १९ जून २०२० रोजी प्राप्त झाला त्यांचे १७ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दोन हजार ७७१ वीज ग्राहकांची वीज बिल थकबाकीतून मुक्ती

भद्रकाली फ्रुट मार्केट,मेनरोड येथील ६२ वर्षीय वृद्ध महिला ८ जून २०२० कोरोना बाधित असल्याचा अहवाल दिनांक ८ जून २०२० रोजी प्राप्त झाला त्यांचे दिनांक २० जून  २०२० रोजी निधन झालेले आहे.

जुने नाशिक, कोकणीपुरा येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल १७ जून २०२० रोजी प्राप्त झाला त्यांचे दिनांक २० जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790